मंचर - आदर्श गाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) ते जवळके (ता. खेड) घाटात मंगळवारी (ता. ३) दुपारी अडीच वाजता खडीने भरलेला हायवा वाहन दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चालकाचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मंचर येथीलखासगीरुग्णालयात उपचार सुरू आहेत.