Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर अपघात; एन्डेवर चालक व दूचाकीस्वाराचा जागीच मृत्यु

पुणे-नगर रस्त्यावर पाषाण मळा येथील दूभाजकाजवळून यु टर्न घेणाऱ्या एन्डेवर मोटारीला भरधाव वेगातील कंटेनरने मागून ठोकर दिली.
Endeavour car and Two Wheeler Accident

Endeavour car and Two Wheeler Accident

sakal

Updated on

शिरूर - शिरूर शहराबाहेरून जाणाऱ्या (बायपास) पुणे-नगर रस्त्यावर पाषाण मळा येथील दूभाजकाजवळून यु टर्न घेणाऱ्या एन्डेवर मोटारीला भरधाव वेगातील कंटेनरने मागून ठोकर दिली. या धडकेनंतर एन्डेवर मोटार दूभाजकाजवळ उभ्या असलेल्या दूचाकीवर आदळून विरूद्ध दिशेला आली आणि त्याचवेळी विरूद्ध दिशेने भरधाव जाणाऱ्या बसने मोटारीला ठोकरले. यात एन्डेवर चालक व दूचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला. आज सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर पुणे - अहिल्यानगर महामार्गावर शिरूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com