
आळेफाटा : पुणे येथून कारमधून नाशिकला लग्नासाठी जात असताना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी शिवारात (बोटा, ता.संगमनेर) अपघात होवून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. सदर घटना रविवार दि.२६ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. यामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.