पुणे - छातीत वेदना होत असलेल्या तरुणाला औंध येथील जिल्हा रुग्णालयात पहाटे उपचारासाठी आणले. कर्तव्यावरील डॉक्टरांनी त्याची हृदयविकाराचे प्राथमिक निदान करणारी ‘ईसीजी’ (इलेक्ट्रोकार्डिओग्राफी) चाचणीही केली..मात्र, डॉक्टरांनी प्रत्यक्षात पित्त, मळमळ याचे निदान करत व वेदनाशामक उपचार केले अन् घरी पाठवले. घरी गेल्यावर पंधरा मिनिटांतच तो जमिनीवर कोसळला तो कायमचाच. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी जाण्याची हृदयद्रावक घटना रविवारी पहाटे घडली असून, याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे..ममतानगर, जुनी सांगवी येथील ३० वर्षीय सुमीत श्रीकांत गद्रे (सोनावणे) या तरुणाचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.सांगवी पोलिसांनी त्यांना तक्रार देण्याचे व ससूनमधील तज्ज्ञांच्या अहवालानंतर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यावर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. तक्रारीनुसार, रविवारी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी सुमीतच्या छातीत वेदना होऊ लागल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलवले..तेथील कर्तव्यावरील आपत्कालीन कक्षातील डॉक्टरांनी (सीएमओ) त्याची हृदयविकाराचे प्राथमिक निदान करणारी ‘ईसीजी’ चाचणी केली. मात्र, ही चाचणी सामान्य असून, हृदयविकाराची शक्यता नाकारत प्रत्यक्षात पित्ताचा त्रास होणारी गोळी व त्याचबरोबर मळमळ, चक्कर थांबवणारे तसेच वेदना कमी होणारे दोन इंजेक्शन दिले, असे तक्रारीत म्हटले आहे. वेदना थोड्या कमी झाल्यावर त्यांना घरी पाठवले..घरी गेल्यावर सुमीत लघुशंकेला जाऊन आला अन् पंधरा मिनिटांतच तो जमिनीवर कोसळला. यानंतर नातेवाईक त्याला घेऊन पुन्हा जिल्हा रुग्णालयात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत रुग्णालयाची बाजू जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही..जिल्हा रुग्णालयात हृदयरोगांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हृदयविकारतज्ज्ञ नावालाच आहेत. ते काही वेळ येतात व निघून जातात. यावेळी जर तेथील डॉक्टरांनी या रुग्णाला घरी न पाठवता हृदयविकाराची सुविधा असलेल्या दुसऱ्या रुग्णालयात किंवा ससून येथे पाठवले असते तर त्याचा जीव वाचू शकला असता.’’– शरत शेट्टी, आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्तेभाऊ सुमीतवर योग्य ते उपचार डॉक्टरांनी केले असते तर त्याचा प्राण वाचला असता. तो महाविद्यालयात शिपायाचे काम करत होता. डॉक्टरांनी हलगर्जीपण केल्याने त्याचा मृत्यू ओढवला. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.– विवेक गद्रे, सुमीतचा भाऊ.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.