हेरॉइनची विक्री करणाऱ्या वडील आणि मुलाला दहा वर्ष तुरुंगवास

A father and son selling heroin have been sentenced by a court to ten years hard labor and a fine of Rs one lakh each
A father and son selling heroin have been sentenced by a court to ten years hard labor and a fine of Rs one lakh each

पुणे : हेरॉइन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या वडील आणि मुलाला न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा निकाल दिला.

नझीर अहमद महम्मद हजरत शेख (वय 66) आणि अहमद नझीर शेख (वय 34, दोघेही रा. मिलिंदनगर, मुंढवा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या ड्रग्ज वितरकांची नावे आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल असलेला रफिक कादर बेग याचा खटल्याच्या सुनावणी दरम्यान मृत्यू झाला आहे. तिघांवर दोन फेब्रुवारी 2009 रोजी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक बाजीराव पाटील यांना माहिती मिळाली होती की, शेख बाप-लेक मुंढवा येथील घरात अंमली पदार्थाची विक्री करतात. तर बेग हा ते पदार्थ खरेदीसाठी येणार आहे. त्यानुसार पथकाने शेख पिता-पुत्राच्या घरी छापा मारून त्यांची आणि घराची झडती घेतली होती. त्यात त्यांच्याकडे एक किलो अंमली पदार्थ, वजन काटा व मापे आढळून आली होती. खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजात हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार ए. एल. गायकवाड आणि सी. एस. जाधव यांनी मदत केली.

ते घर शेख यांचे नव्हतेच : बचाव पक्ष

अंमली पदार्थ विरोधी पथकाने ज्या घरावर छापा टाकला ते घर शेख पिता-पुत्राचे नव्हते, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला होता. मात्र ऍड. अगरवाल यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोघांना दहा वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी एक वर्ष कारावास भोगावा लागणार आहे. खटल्यात तीन साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.


संपादन - सुस्मिता वडतिले 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com