
पुणे : वैष्णवी हगवणे यांचा खून झाल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालात गळ्याभोवती व्रण असून, शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या जखमा आढळल्या आहेत. या अनुषंगाने पोलिसांकडून तपास करण्यात येणार आहे. दरम्यान, वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना न्यायालयाने शुक्रवारी (ता. २३) पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.