सासरा तिला म्हणाला, शारीरिक संबंध ठेव नाहीतर...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने सुनेला मारहाण करीत विनयभंग केला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात 55 वर्षीय सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी : शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने सुनेला मारहाण करीत विनयभंग केला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात 55 वर्षीय सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी 27 वर्षीय सुनेने फिर्याद दिली आहे. आरोपी सासऱ्याने दोन वेळा सुनेचा विनयभंग केला. याचा जाब सुनेने विचारल्यानंतर 'तु माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाही तर, तुला प्रॉपर्टीत हिस्सा देणार नाही, तुमचं कस होणार ठरव, असे म्हणत सुनेशी वेळोवेळी लगट करण्याचा प्रयत्न केला.

शुक्रवारी (ता.14) सकाळी फिर्यादी या घरी काम करीत असताना सासऱ्याने पुन्हा त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. त्यास फिर्यादीने नकार दिला असता सासऱ्याने त्यांना शिवीगाळ व मारहाण केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father in law sexually assaults his daughter in law in Pimpri