
पुणे : थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या अस्तित्वाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या दिलीप मंडल यांना सत्यशोधक चळवळीच्या नेत्या प्रतिमा परदेशी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दिलीप मंडल यांना केंद्रात मोठी खुर्ची मिळालेली असल्यानं त्यांनी हे आरोप केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.