

Burger King Camp
esakal
पुणे - अन्नसुरक्षा नियमांचे पालन न केल्याप्रकरणी पुणे कॅम्प परिसरातील प्रसिद्ध ‘बर्गर किंग’ या आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली असून, त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षा मानकांच्या पालनाची तपासणी करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली.