Jaggery Seized : दौंडमध्ये गूळ उत्पादकांवर ‘एफडीए’ ची कारवाई; १७ लाखांचा गुळाचा साठा जप्त

गुळाची गोडी वाढावी व त्‍याला रंग चांगला यावा म्‍हणून गूळ उत्‍पादक त्‍यामध्‍ये साखरेचे मिश्रण घालत असल्‍याचा प्रकार आला उघडकीस.
Jaggery Seized in Daund

Jaggery Seized in Daund

sakal

Updated on

पुणे - गूळ हा उसाच्‍या रसापासून तयार होतो व तो पूर्णपणे रसापासूनच तयार व्‍हायला हवा. मात्र, आता त्‍याची गोडी वाढावी व त्‍याला रंग चांगला यावा म्‍हणून गूळ उत्‍पादक त्‍यामध्‍ये साखरेचे मिश्रण घालत असल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दौंड तालुक्यातील गूळ उत्पादन करणाऱ्या चार आस्थापनांवर कारवाई करत तब्बल साडेसोळा टन गूळ आणि २० टन साखरेचा साठा जप्त केला आहे. जप्त मालाची किंमत १७ लाख रुपये असून त्‍यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com