

FDA Crime
ESakal
पुणे - सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांमधील भेसळ आणि लेबलवरील नियमभंगाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत १२ आस्थापनांवर धाडी टाकून संशयास्पद ५६ लाख ३६ हजार रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठ्याप्रकरणी १४ ठिकाणी कारवाई करून सुमारे २० लाख २६ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.