

FDA Crime
ESakal
पुणे - अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने बनावट अमूल चीज आणि प्रतिबंधित सुगंधित तंबाखूविरोधात केलेल्या कारवाईत तब्बल ३० लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत २.५७ लाख रुपयांचे बनावट चीज, २८.३२ लाख रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि सुमारे एक लाख रुपयांची पॅकिंग मशीन जप्त करण्यात आली. संबंधित घर सील करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.