fda crime in uruli devachi
sakal
पुणे - उरुळी देवाची परिसरात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या सुगंधित तंबाखू आणि जर्दा निर्मितीच्या कारखान्यावर गुन्हे शाखा युनिट- पाच आणि अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संयुक्त छापा टाकला. या कारवाईत ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, मध्य प्रदेशातील दोघांना अटक करण्यात आली आहे.