Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

दिसायला पांढरेशुभ्र दूध. मात्र ते खरे नव्‍हते. तर ते होते घातक रसायनांपासून तयार केलेले कृत्रिम व भेसळयूक्‍त सफेद द्रावण.
Milk Adulteration

Milk Adulteration

sakal

Updated on: 

पुणे - दिसायला पांढरेशुभ्र दूध. मात्र ते खरे नव्‍हते. तर ते होते घातक रसायनांपासून तयार केलेले कृत्रिम व भेसळयूक्‍त सफेद द्रावण. त्‍यामध्‍ये होते डिटर्जंट, शाम्‍पू, खाद्यतेल, व्‍हे पावडर व इतर पदार्थ. जुलै महिन्‍यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मंचर येथे कृत्रिम व भेसळयुक्‍त दुधाचे रॅकेट उघडकीस आणले. मात्र, त्‍याची व्‍याप्‍ती ही केवळ मंचरपुरती न राहता ते दूध इंदापूर व सोलापुरातील माळशिरस येथील सोनाईसह बड्या दूध डेअऱ्यांपर्यंत पोचत असल्‍याची साखळीच ‘एफडीए’ ने तपास करत उघडकीस आणली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com