

FDA Crime
ESakal
पुणे - ज्या औषधांमुळे आजारपण दूर होते त्या आयुर्वेदिक औषधांमध्ये बुरशी, कीटक, अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे जिल्ह्यातील जेजुरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथील इंड्युकेअर फार्मा प्रा. लि. या कंपनीचा आयुर्वेदिक औषध उत्पादन परवाना रद्द केला आहे. कंपनीने तयार केलेली सहा आयुर्वेदिक औषधांनी गुणवत्तेचे उल्लंघन केल्यनेर ही कारवाई करण्यात आली.