FDA Crime : ‘एफडीए’ची कॅम्प, एमजी रोडवरील २० हॉटेलची तपासणी; ॲमेझॉन, बिग बास्केट च्‍या गोडावूनवरही छापे

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कॅम्प व महात्मा गांधी रस्ता परिसरातील २० हॉटेल्स व उपाहारगृहांची केली तपासणी.
FDA Crime

FDA Crime

ESakal

Updated on: 

पुणे - अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कॅम्प व महात्मा गांधी रस्ता परिसरातील २० हॉटेल्स व उपाहारगृहांची तपासणी केली. त्यामध्ये ८ हॉटेलच्‍या स्वयंपाकघरात अत्‍यंत अस्वच्छता, मोठ्या प्रमाणात कीटकांचा प्रादुर्भाव, कृत्रिम रंगांचा वापर आढळल्याने त्यांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले. त्याचबरोबर सिंहगड रस्त्यावरील ॲमेझॉन आणि बिग बास्केटच्या दोन गोडावूनवरही गंभीर अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने त्यांचेही परवाने निलंबित करण्यात आले.

Loading content, please wait...