esakal | प्लाझ्मा तुटवडा रोखण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांना एफडीएचे आदेश

बोलून बातमी शोधा

blood donation
प्लाझ्मा तुटवडा रोखण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांना एफडीएचे आदेश
sakal_logo
By
मंगेश कोळपकर

पुणे : शहरातील प्लाझ्माचा वाढता तुटवडा रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने त्यांच्याकडून डिचार्ज झालेल्या रुग्णांचीं माहिती शहरातील 21 ब्लॅड बॅंकांना द्यावी, असे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) दोन्ही महापालिकांना दिले आहेत.

शहरात सध्या प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना धावाधाव करावी लागत आहे. हा तुटवडा कमी करण्यासाठी एफडीएने दोन्ही महापालिकांनी त्यांच्याकडे नोंद असलेल्या डिश्चार्ज रुग्णांची माहिती ब्लड बॅकांना द्यावी, असे सांगितले आहे. त्यानुसार ब्लड बॅकां संबंधित बऱया झालेल्या नागरिकांशी संपर्क साधून त्यांना प्लाझ्मा दानाबद्दल समजावून सांगतील, असे एफडीएचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच कोरोना रुग्णांचा डिश्चार्ज होताना त्यांना प्लाझ्मा दानाचे महत्त्व समजावून सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेने त्यांच्याकडील डिश्चार्ज झालेल्या रुग्णांची माहिती ब्लड बॅकांना केली आहे. या बाबत पुणे महापालिकेत विचारणा केली असता, एफडीएकडून पत्र आले आहे. मात्र, त्यावर वरिष्ठ अधिकाऱयांकडून अद्याप निर्णय झालेला नाही, असे सांगण्यात आले.

20 टक्केच मागणी पूर्ण

प्लाझ्माचा सध्या प्रचंड तुटवडा आहे. आमच्याकडे येणाऱया कॉलपैकी फक्त 20 टक्के लोकांनाच आम्ही प्लाझ्मा देऊ शकतो. डोनर काही प्रमाणात पुढे येत आहेत, पण त्यांची संख्या अत्यल्प आहे. प्लाझ्मा मागण्यासाठी येणाऱया रुग्णांच्या नातेवाईकांनाच अनेकदा डोनर शोधावा लागतो. प्लाझ्मा दानासाठी लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. तसेच प्लाझ्मा दानासाठी येणाऱ्या नागरिकांची अॅंटीबॉडीजची आणि अन्य चाचण्या ब्लड बॅंकांतच केल्या जातात, अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलच्या ब्लड बॅंकेच्या प्रमुख डॉ. स्मिता जोशी यांनी सांगितले.

प्लाझ्मा थेरपी ठरते प्रभावी

कोरोनाच्या रुग्णांवर इंजेक्शनपेक्षा प्लाझ्मा थेरपी प्रभावी ठरत असल्याचे दिसत असल्यामुळ प्लाझ्माची मागणी वाढली आहे. त्यासाठी जास्तीत प्लाझ्या दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून प्लाझ्मादान करण्याची मानसिकता समाजात रुजविण्याची गरज असल्याचे मत रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड यांनी सांगितले.

यावर उपाय काय

महापालिकेने ब्लड बॅंकांना डिश्चार्ज झालेल्या रुग्णांची माहिती तातडीने दिल्यास बॅंका, स्वयंसेवी संस्था त्यांच्याशी संपर्क साधू शकतील. त्यातून प्लाझ्मा दानासाठी गती येईल आणि गरजू रुग्णांना दिलासा मिळेल.