
Cough Syrup Testing
sakal
पुणे : कोल्ड्रीफ कफ सिरपचे सेवन केल्याने मध्य प्रदेश येथे बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुण्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए, औषध विभाग) खबरदारी म्हणून पुण्यातील मेडिकलमधून खोकल्यावरील इतर कंपन्यांचे कफ सिरपचे नमुने गोळा करण्यास सुरुवात केली आहे. औषधांचे हे नमुने प्रयोगशाळेत पाठवून त्यामध्ये काही अपायकारक घटक आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे.