FDA Crime : गार्डन वडापाव, रामकृष्‍ण मिल्‍ससह आठ ठिकाणांच्या खाद्यतेलावर कारवाई; पुणे जिल्ह्यात ३४ हजार ४८१ किलो तेल ताब्यात

सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यतेल उपलब्ध व्हावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे जिल्ह्यातील आठ आस्थापनांवर केली धडक कारवाई.
Edible Oil

Edible Oil

esakal

Updated on: 

पुणे - सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यतेल उपलब्ध व्हावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे जिल्ह्यातील आठ आस्थापनांवर धडक कारवाई केली. या कारवाईत निकृष्ट दर्जाचे अथवा असुरक्षित असण्याचा संशय असलेले तसेच लेबलिंगमध्ये त्रुटी असलेले सुमारे ३४ हजार ४८१ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. या तेलाची किंमत सुमारे ५८ लाख ९० हजार रुपये आहे. ही कारवाई नऊ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. गार्डन वडापाव, रामकृष्‍ण मिल्ससह आठ ठिकाणांच्या खाद्यतेलावर कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com