FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर सुरू केलेल्या विशेष मोहिमेत पुण्यातील दोन आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.
FDA Crime

FDA Crime

ESakal

Updated on

पुणे - सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर सुरू केलेल्या विशेष मोहिमेत पुण्यातील दोन आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथील ‘क्रीमी डिलाइट’ या आस्थापनेत दूध, बटर आणि स्किम्ड मिल्क पावडर असे एकूण १ हजार ५१९ किलो अन्नपदार्थांवर कारवाई केली. तर आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील ‘महावीर डेअरी’ येथे ४९ किलो खवा, १०४ किलो पनीर आणि ११ किलो तूप आढळले. ते निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com