
PMRDA Protest
Sakal
पिंपरी : चाकण परिसरातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते, कचरा प्रश्न, एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधांचा अभाव आदी विविध समस्यांबाबत ‘ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समिती’तर्फे गुरुवारी (ता. ९) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. चाकण ते आकुर्डी अशा पायी मोर्चात उद्योजक, कामगार, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि चाकण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.