‘कोरोना’तील पोलिसांचे कार्य ‘फील द बीट’द्वारे वाचकांसमोर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या पोलिसांच्या कामाची जाणीव पोलिस आयुक्त डॉ. के.वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांना होती.डॉ. वेंकटेशम यांच्या संकल्पनेतूनच या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली.

पुणे - कोणाला प्रसूतीसाठी, काहींना अंत्यसंस्काराला जाण्यासाठी, तर कधी काळजाच्या तुकड्याला एकत्र आणण्यासाठी पुणे पोलिसांनी सध्याच्या कोरोनाच्या काळात धडपड केली. पुणे पोलिस प्रशासनाने या कामाची दखल ‘फील द बीट’ या सचित्र पुस्तकाद्वारे घेऊन पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

कोरोनामुळे लॉकडाउनची कडक अंमलबजावणी सुरू होती. त्यातच एका मूकबधिर वधुपित्याचा बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांना फोन आला. त्यांच्या मूकबधिर मुलीचे औरंगाबादमधील एका मूकबधिर मुलाशी लग्न होणार आहे. परंतु, लॉकडाउनमुळे मुलाला पुण्यात येण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. घाडगे यांनी त्या मुलासाठी फक्त पास उपलब्ध करून दिला नाही, तर घाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण लग्न पार पाडले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या पोलिसांच्या कामाची जाणीव पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांना होती. डॉ. वेंकटेशम यांच्या संकल्पनेतूनच या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली.

पोलिसांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक करावे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारावी, यासाठी पुणे पोलिस प्रशासनाने ‘फील द बीट’ हे सचित्र पुस्तक तयार केल्याची माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

काय आहे पुस्तकात?
विविध पोलिस ठाण्यांतील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाच्या २५ घटनांचा समावेश या पुस्तकात आहे. त्यामध्ये ‘लग्नाची बेडी’, ‘देवदूत’, ‘खाकी किंग’, ‘काळ आला होता; पण..’, ‘मला माझी आई हवी आहे’, ‘एक कहाणी पोतराजाची’, ‘ईद साजरी होणारच’, अशा घटना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. हे पुस्तक ६८ पानांचे असून, ते मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही वाचता येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Feel the beat new book on Police work in Corona