esakal | मायबोलीला विसरणार नाही...
sakal

बोलून बातमी शोधा

मायबोलीला विसरणार नाही...

जागतिक भाषा असलेल्या इंग्रजीने मराठी भाषकांच्या माजघरात शिरकाव केला. त्यामुळे येणाऱ्या पिढीला मराठीचे आपलेपण राहते का नाही, याची शंका सारस्वतांसह सामान्य मराठी माणसाला आजही आहे.

मायबोलीला विसरणार नाही...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - जागतिक भाषा असलेल्या इंग्रजीने मराठी भाषकांच्या माजघरात शिरकाव केला. त्यामुळे येणाऱ्या पिढीला मराठीचे आपलेपण राहते का नाही, याची शंका सारस्वतांसह सामान्य मराठी माणसाला आजही आहे; पण तंत्रज्ञानाने जरी आम्ही आधुनिक असलो तरी, ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी...’ अशी भावना आजच्या तरुणाईने व्यक्त केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंग्रजीच्या जमान्यात मराठी भाषेला विसर पडणाऱ्या तरुणाईचे मत जाणून घेण्यात आले. काळासोबत राहण्यासाठी इंग्रजी भाषेची गरज आहे. तरीसुद्धा मराठी आमची मातृभाषा आहे आणि त्या भाषेचे वर्चस्व टिकविण्यासाठी आम्ही मराठीचा अभ्यास करत राहू, असे मत मराठी दिनानिमित्त तरुणाईने व्यक्त केले.

मराठी भाषा बोलण्यासाठी मराठीची गोडी निर्माण होणे आवश्‍यक आहे. असे झाले तर आमच्यासारख्या तरुणांना कधीच मराठीच्या वाक्‍यांमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर करण्याची गरज राहणार नाही. 
- राधिका दातीर


माझे शिक्षण मराठी शाळेतून झाले आहे. त्यामुळे सहसा मराठी बोलताना मला कोणताही अडथळा येत नाही; पण जेव्हा मी मित्रांसोबत संवाद करतो, तेव्हा ते नेहमी इंग्रजीमध्ये बोलतात. त्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्यामुळे त्यांची ही मानसिकता आहे की मराठी शाळेतील मुलांना इंग्रजी येत नाही.
-आकाश वायाळ


इंग्रजी भाषेचा वापरामुळे सध्या घरातपण मराठी बोलताना नकळत इंग्रजी शब्द येतात. याची खंतसुद्धा आहे की मराठी असून मला माझा मातृभाषेत बोलताना काही अडचणी येतात.
- शुभम पवार


फक्त मराठी नागरिकांनीच नाही; तर प्रांतातून येणाऱ्यांनीही मराठी शिकली पाहिजे. मराठीच्या संवर्धनासाठी हे आवश्‍यक आहे.
- श्रेया अरळीकर


तरुणाईला मराठीपेक्षा इंग्रजी जवळची : परांजपे
आपल्या पाल्याला इंग्रजीत शिक्षण मिळावे यासाठी सध्या पालकवर्ग इंग्रजी माध्यमाच्या शाळेची निवड करतात. इतकेच नाही, तर घरातसुद्धा आपल्या मुलांसोबत बोलताना इंग्रजीचा अधिक आणि मातृभाषेचा वापर कमी करतात. यामुळे सध्याच्या तरुणाईला वाटते की इंग्रजी भाषा मराठी भाषेच्या तुलनेत जास्त महत्त्वपूर्ण आहे, असे मत ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्रा. प्र. ना. परांजपे यांनी व्यक्त केले.

मुले मराठीपासून दुरावण्याची काही कारणे 
शाळेतील इंग्रजी ही श्रेष्ठ आणि घरी बोलली जाणारी मराठी दुय्यम या विचारसरणीमुळे मातृभाषेला कमी लेखले जाते.
शुल्क जास्त असल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळा मोठ्या, असे गृहीत धरले जाते.
पालक, शिक्षक यांचा भाषेविषयीचा दृष्टिकोन मुलांवर दीर्घकाळ परिणाम करतो. 
इंग्रजी बोलणे, मराठी बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर करणे हा आपल्या प्रतिष्ठेचा भाग आहे, असा मुलांचा समज होतो.

loading image
go to top