Volunteers from the Shri Shivdurg Sanvardhan Sanstha transporting a female tourist from the fort for medical treatment.
sakal
- पांडुरंग साठे
कोळवण - मुळशी व मावळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या तिकोना गडावर फिरण्यासाठी आलेल्या एका महिला पर्यटकाचा पाय घसरून पडल्याने अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव मनीषा जगन्नाथ ढमाले (वय-३८) रा. दत्तवाडी, पुणे असे या महिला पर्यटकांचे नाव असून हि महिला शुक्रवार ता. २७ रोजी तिकोना गडावर दुपारी २ वाजता पर्यटनासाठी आली असताना बालेकिल्ला व त्याखालील दरवाजा यांच्यामध्ये असलेल्या खडतर अशा पायऱ्यांवर पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाली.