

Over 140 Fergusson College NSS students joined hands with farmers for paddy plantation at Jamgaon under Savitribai Phule Pune University's 'Yuvan' campaign.
Sakal
पुणे : आजच्या गतिमान, तांत्रिक आणि डिजिटल युगात तरुणाईला आपल्या शेती, माती आणि परंपरांशी जोडून ठेवणे अत्यंत गरजेचे बनले आहे. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभवातून सामाजिक जाणिवा समृद्ध करणे हा आजच्या काळातील कळीचा मुद्दा ठरत आहे. याच विचारातून आणि प्रेरणेतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभिनव 'युवान' अभियानांतर्गत आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने मुळशी तालुक्यातील निसर्गरम्य जामगाव येथे एक अत्यंत प्रेरणादायी भात लागवड उपक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.