पुणे - वापरलेली फेरारी घेण्यासाठी दिलेले २५ लाख रुपयांची अनामत रक्कम परत न करणे महागड्या जुन्या वाहनांची विक्री करणाऱ्या कंपनीस महागात पडले आहे. तक्रार दाखल केल्याचा तारखेपासून वार्षिक सहा टक्के व्याजासह २५ लाख रुपये तक्रारदारास परत करावेत. तसेच नुकसान भरपार्इ पोटी एक लाख रुपये आणि तक्रार खर्चाचे १० हजार रुपये द्यावेत, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.