प. आशियातील युध्दाचा खतांच्या पुरवठ्यावर फारसा परिणाम होणार नाही — केंद्र सरकारची माहिती

प. आशियातील युध्दाचा खतांच्या पुरवठ्यावर फारसा परिणाम होणार नाही — केंद्र सरकारची माहिती

Published on

‘खतांच्या पुरवठ्यावर
युद्धाचा परिणाम नाही’
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.६ ः देशात खतांचे पुरेसे साठे असून पश्‍चिम आशियात सुरू असलेले युद्ध तसेच होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्याचा खत पुरवठ्यावर फारसा परिणाम पडणार नाही, अशी स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले. सध्याचा खतांचा राखीव साठा १७७.३१ लाख टन इतका आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १२९.८५ लाख टनांच्या तुलनेत तो ३६.५ टक्क्यांनी जास्त असल्याचे खत विभागाकडून आज सांगण्यात आले.
सरकारच्या प्राधान्यक्रमात शेतकरी अग्रस्थानी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताशी कोणत्याही परिस्थिती तडजोड केली जाणार नाही. शेतकऱ्यांनी कोणत्याही भीतीशिवाय खरीप हंगामाच्या तयारीची सुरुवात करावी, असे सरकारने सांगितले आहे.
देशात सर्वात मोठ्या प्रमाणात युरिया खत विकले जाते. या खताच्या निर्मितीसाठी नैसर्गिक वायूची मोठ्या प्रमाणात गरज असते. भारताला प्रामुख्याने कतार आणि इतर आखाती देशांकडून वायूचा पुरवठा होतो. देशात सध्या ५९.३० लाख टन इतका युरिया खताचा साठा आहे. डायअमोनियम फॉस्फेट (डीएपी) खताचा २५.१३ लाख टन तर ‘एनपीके’ खतांचा साठा ५५.८७ लाख टन इतका साठा असल्याची माहिती खत विभागाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com