
Pune Bus
sakal
पुणे : सणासुदीच्या तोंडावर पुणेकरांचा गावी जाण्याचा मार्ग खासगी बसचालकांनी केलेल्या दरवाढीमुळे खडतर झाला आहे. रेल्वे आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) विशेष गाड्यांचे आरक्षण संपल्याने, शहरातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. मागणी वाढताच, खासगी ‘ट्रॅव्हल्स’च्या तिकिटांच्या दरात तीन ते चारपट वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.