

Farmers are encouraged to register on the FFS app for subsidized fertilizer booking.
esakal
खळद,: केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अनुदानित रासायनिक खतांच्या वितरणासाठी आता ‘एफएफएस’ (Farmer Fertilizer System) ॲपद्वारे ऑनलाइन नोंदणी व बुकिंग करणे बंधनकारक झाले आहे. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका गुणनियंत्रण निरीक्षक अधिकारी स्नेहल धायगुडे यांनी केले.