महिन्यात ५५ कोटींची उलाढाल

महिन्यात ५५ कोटींची उलाढाल
Updated on

नारायणगाव  - जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत सप्टेंबरमध्ये ४ लाख ९१ हजार ३८४ कांदा पिशव्यांची (२ लाख ४५ हजार ६९२ क्विंटल) आवक झाली. कांद्याला सरासरी साडेबावीस रुपये भाव मिळाला. कांदा खरेदी-विक्रीतून एका महिन्यात (सप्टेंबर) ५५ कोटी २८ लाख ७ हजार रुपयांची उलाढाल झाली. 

दरम्यान, मागील पाच वर्षांचा आढावा घेतल्यास २०१९ मधील सप्टेंबर महिना कांदा उत्पादकांना दिलासा देणारा ठरला. मात्र, केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने पुढील दोन महिन्यांत कांदा उत्पादकांना कोट्यवधींचा फटका बसणार आहे, अशी माहिती सभापती संजय काळे यांनी दिली.

या बाबत काळे यांनी सांगितले की, जुन्नर बाजार समितीच्या आळेफाटा, जुन्नर, ओतूर येथील उपबाजारात कांद्याचे लिलाव होतात. उपबाजारात जुन्नर, पारनेर, आंबेगाव, शिरूर तालुक्‍यातील शेतकरी कांदा विक्रीसाठी आणतात. मागील पाच वर्ष कांद्याला भाव मिळालेला नाही. मागील वर्षी चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब झाल्याने तो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. या वर्षी टंचाईमुळे रब्बी हंगामात कांदा लागवडीत मोठी घट झाली होती. मार्चअखेर चाळीत साठवून ठेवलेला कांदा शेतकऱ्यांनी ऑगस्टमध्ये विक्रीसाठी काढला. एक ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०१९ दरम्यान कांद्याला प्रतवारीनुसार प्रतिकिलो सहा रुपयांपासून पंचवीस रुपयांदरम्यान भाव मिळाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune PMC may expand Education Committee powers
PMC’s DBT plan for sanitation equipment hits a roadblock
Socialist thinker Ratnakar Mahajan passes away in Pune.
Rahul Kul leads Vidarbha review on jobs and development.
Marathi News Esakal
www.esakal.com