esakal | नुकसानग्रस्तांना एकरी पन्नास हजारांची मदत तातडीने द्यावी : रामदास आठवले 
sakal

बोलून बातमी शोधा

नुकसानग्रस्तांना एकरी पन्नास हजारांची मदत तातडीने द्यावी : रामदास आठवले 

कऱ्हावागज (ता. बारामती) येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची व कऱ्हानदीवरील पूलाची केंद्रीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पाहणी केली.

नुकसानग्रस्तांना एकरी पन्नास हजारांची मदत तातडीने द्यावी : रामदास आठवले 

sakal_logo
By
विजय मोरे

उंडवडी : "अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने एकरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी. आम्ही देखील केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना करण्यासाठी प्रयत्न करु," असे मत केंद्रीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी कऱ्हावागज येथे व्यक्त केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कऱ्हावागज (ता. बारामती) येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची व कऱ्हानदीवरील पूलाची केंद्रीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पाहणी केली. यावेळी ते ग्रामस्थ व पत्रकारांशी बोलत होते. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

याप्रसंगी आरपीआयचे सुनील शिंदे, सोमनाथ पाटोळे, रोहित मोरे, मयुर मोरे, प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

आठवले पुढे म्हणाले, "राज्यात पावसामुळे नुकसान झाले आहे. शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. नुकसान शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे राज्य सरकारची मोठी जबाबदारी आहे. केंद्र सरकार देखील शेतकऱ्यांना मदत करेल."

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार आहेत. असे पत्रकारांनी आठवले यांना विचारल्यानंतर ते म्हणाले, "खडसे यांनी आरपीआय पक्षात यावे. मात्र त्यांना तिकडे मंत्रीपद मिळू शकते. त्यामुळे त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहे." 

(संपादन : सागर डी. शेलार)