Babri Banner in Pune: पुणे एफटीआयआय बॅनर प्रकरणी पोलिसांची कारवाई; डेक्कन पोलिसांत १५ जणांविरोधात गुन्हे दाखल

Babri Banner in Pune: काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. २३) दुपारी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) परिसरात वादग्रस्त बॅनर जाळले.
Babri Banner in Pune
Babri Banner in PuneEsakal

काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. २३) दुपारी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) परिसरात वादग्रस्त बॅनर जाळले. या वेळी हाणामारी झाल्याने काही विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी रात्री १५ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थी संघटनेतर्फे ‘रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन’ अशा आशयाचे बॅनर इन्स्टिट्यूटच्या आवारात झळकविण्यात आले होते. या वादग्रस्त बॅनरमुळे मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हिंदुत्ववादी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत ‘एफटीआयआय’च्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर आवारातील बॅनर या कार्यकर्त्यांनी जाळले.

Babri Banner in Pune
Babri Banner in Pune: FTIIमध्ये झळकले बाबरी मशिदीचे वादग्रस्त बोर्ड, आक्रमक हिंदुत्ववादी संघटनांकडून जाळण्यात आले बॅनर

या दरम्यान ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधीही तेथे आल्यावर दोन गटांमध्ये वादावादी झाली. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले. या घटनेनंतर पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपिन हसबनीस यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Babri Banner in Pune
Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता, उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीपासून मिळणार दिलासा

‘एफटीआयआय’ विद्यार्थी संघटनेने याबाबत निवेदन प्रसिद्ध करत आपली बाजू स्पष्ट केली. ‘एफटीआयआय’च्या आवारात आलेल्या जमावाने सुरक्षा रक्षकांना दाद दिली नाही. काही विद्यार्थ्यांनी चौकशी केली असता जमावाने त्यांना शिवीगाळ केली. विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मंकम नोकव्होम यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांना या जमावाने मारहाण केली. या वेळी सुरक्षा रक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली होती. या गंभीर हल्ल्याचा निषेध आम्ही करतो’, असे या निवेदनात म्हटले आहे.

Babri Banner in Pune
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत पहिल्याच दिवशी गर्दीचा उच्चांक ; भाविकांना आवरताना पोलिसांची दमछाक, काहीकाळ दर्शन थांबविले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com