esakal | भोर, पुरंदर, जुन्नरचा अंतिम निर्णय लवकरच : राष्ट्रवादी काँग्रेस
sakal

बोलून बातमी शोधा

भोर, पुरंदर, जुन्नरचा अंतिम निर्णय लवकरच : राष्ट्रवादी काँग्रेस

आगामी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागा वाटपाबाबत सध्या केवळ प्राथमिक चर्चा चालू आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर आणि जुन्नर हे तीन विधानसभा मतदारसंघ काँंग्रेसला सोडण्याबाबत अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही.

भोर, पुरंदर, जुन्नरचा अंतिम निर्णय लवकरच : राष्ट्रवादी काँग्रेस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागा वाटपाबाबत सध्या केवळ प्राथमिक चर्चा चालू आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर आणि जुन्नर हे तीन विधानसभा मतदारसंघ काँंग्रेसला सोडण्याबाबत अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. या तीन मतदारसंघांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अन्य सर्वच विधानसभा मतदारसंघाच्या वाटपाची चर्चा सुरु असून, याबाबत येत्या काही दिवसात निर्णय होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बुधवारी (ता.४) सांगितले.          

आगामी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी (ता.३)  मुंबईत या दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघातील जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अशा बैठका सुरु आहेत. मात्र अद्याप एकाही जागेचा अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर, जुन्नर आणि इंदापूर या चार जागांचा अंतिम निर्णय हा दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असेही गारटकर यांनी सांगितले.

loading image
go to top