
पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील सर्वसाधारणतः अंतिम गुणवत्ता यादी बुधवारी (ता. ११) जाहीर होणार आहे. त्यानंतर शून्य प्रवेश फेरी १२ ते १४ जून दरम्यान, तर केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत (कॅप) प्रवेश फेरीत १७ जून रोजी गुणवत्ता यादीच्या आधारे विद्यार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालय वाटपाची प्रक्रिया होणार आहे.