Pune News : अंतिम गट-गण रचना आज जाहीर होणार; विभागीय आयुक्तांची बदलास मान्यता
Pune Politics : पुणे जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली असून, अंतिम रचना शुक्रवारपासून प्रसिद्ध होणार आहे.
"Final ZP & Panchayat Ward Structure Out on Friday!"Sakal
पुणे : जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या प्रभाग रचनेतील बदलास विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मान्यता दिली आहे. अंतिम प्रभागरचना शुक्रवारी (ता.२२) प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.