पुणे - शहरात सगळीकडे बेकायदा होर्डिंगचे पेव फुटलेले असतानाही अवघी २० बेकायदा होर्डिंग असल्याचा अजब दावा महापालिकेने केला होता. हा प्रकार ‘सकाळ’ने उघडकीस आणल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच महापालिकेने ११ बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त केली. .शहरात प्रवेश करणाऱ्या सोलापूर रस्ता, नगर रस्ता, सासवड रस्ता, कात्रज, कात्रज कोंढवा रस्ता, धायरी, आंबेगाव, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रोड), चांदणी चौक, सूस, बाणेर, बालेवाडी, आळंदी रस्ता या प्रमुख रस्त्यांसह अनेक रस्त्यांवर, शहरातील महत्त्वाचे चौक, नदीपात्रातील रस्त्यासह वेगवेगळ्या भागांत बेकायदा होर्डिंगचे पेव फुटलेले आहे. या ठिकाणीही कधी कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे..पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी होर्डिंग पडण्याच्या दुर्घटना शहरात घडतात. धानोरी येथे काही दिवसांपूर्वीच होर्डिंग कोसळले होते. सुर्दैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. यापूर्वी होर्डिंग कोसळण्याच्या घटनांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे हकनाक जीव गेले आहेत. त्यानंतरही महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून बेकायदा होर्डिंगकडे दुर्लक्ष केले जात आहे..अशी केली कारवाईऔंध, बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पाच होर्डिंगवर कारवाईपाषाण सूस रस्त्यावरील मोहननगर, बाणेर, सूस परिसरामधील पाच बेकायदा होर्डिंगवर कारवाईजाहिरातफलक काढण्याबरोबरच होर्डिंगचा लोखंडी सापळेही काढण्यात आलेनगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पाच होर्डिंग काढलेवडगाव शेरी येथील आदर्शनगर, रामवाडी, कल्याणीनगर येथील चार ठिकाणी कारवाईकोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील कोंढवा बुद्रुक येथील कात्रज कोंढवा रस्ता, स्वामी समर्थ नगर, वानवडी येथील संविधान चौक येथे कारवाई.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.