अखेर सुखसागरनगरची बससेवा सुरू | bus service started | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Finally Sukhsagar Nagar bus service started

कात्रज : अखेर सुखसागरनगरची बससेवा सुरू

कात्रज : कोरोना (Corona) काळात बंद झालेली सुखसागरनगरमधील पीएमपीएलची बस (PMPL bus) सेवा सुरू करावी यासाठी प्रगती फाउंडेशन (Pragati Foundation)आणि नागरिकांकडून अनेकवेळा निवेदन देऊनही पीएमपीएल प्रशासन कोणतीच कारवाई करत नव्हते. त्यानंतर फाउंडेशनने आंदोलनाचा पवित्रा घेत स्वारगेटच्या पीएमपीएल कार्यालयासमोर (Swargate PMPML Office) नागरिकांसह आंदोलन केले. याची सकाळनेही सातत्याने दखल घेतली होती. या सर्व बाबींची दखल घेत अखेर पीएमपीएल प्रशासनाने सुखसागरनगरमधील बससेवा क्रमांक ७१,७२,२२ पुन्हा सुरू केली आहे.

हेही वाचा: Bulli Bai : आरोपींची मोडस ऑपरेंडी काय? पोलिसांनी दिली माहिती

बस सुरू झाल्यानंतर नागरिकांकडून बसचे स्वागत व पूजन करून आणि पेढे वाटप करून करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रकाश कदम, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतिक कदम, संतोष धुमाळ, श्रीराम कुलकर्णी आदीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

नागरिकांच्या सोयीसाठी व त्यांच्या हक्कासाठी प्रगती फाउंडेशन कायम प्रयत्न करत राहील. सामाजिक सेवा व सुविधा कशा प्रकारे ऊपलब्ध करता येईल यासाठी केलेल्या प्रमाणिक प्रयत्नाचे हे यश आहे. बस सुविधा सुरु केल्याबद्दल प्रशासनाचे आम्ही आभारी असल्याचे यावेळी प्रतिक कदम यांनी म्हटले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top