'फायनान्स मीट इन डेटा डॉक्टर' या चर्चासत्राचे आयोजन

जनार्दन दांडगे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

लोणी काळभोर (पुणे) : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलाजी विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ मॅनेजमेंट (मिटकॉम) तर्फे आयोजित 'फायनान्स मीट इन डेटा डॉक्टर' यावर विषयावर एकदिवसीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपेक्स सल्लागार कंपनीच्या संचालिका योगिनी ब्राम्हणकर, मिटकॉमच्या संचालिका सुनीता कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू सुनील राय, क्रेडिट स्वीसचे सहाय्यक अध्यक्ष संकेत शहा, नेक्स जन कंपनीचे संस्थापक विनोद कशप, पीएमएस मॅनेजमेंट व मुंडे आणि शहा कंपनीचे प्रकाश पटवर्धन, मीटकॉमचे प्रमुख विवेक सिंग उपस्थित होते.

यावेळी योगिनी ब्राम्हणकर म्हणाल्या,"कोणत्याही क्षेत्रामध्ये ध्येयपुर्ती साधण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेपासून आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल केल्यास यश नक्की मिळते. मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी नियोजन करून करिअर संदर्भात निर्णय घ्यावा. विचाराने अनेक मार्ग सापडतात. तुमचे धैय्य साध्य करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहावे. वेळेचे नियोजन करून धैय गाठण्यासाठी प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांनी स्वतःला अनेक अडचणीवर मात करण्यासाठी तयार करावे."

यावेळी सुनीता कराड म्हणाल्या,"फायनान्स क्षेत्रातील संधी आणि येणाऱ्या अडचणी याविषयावर विद्यार्थ्यांना माहिती व्हावे, यासाठी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात मॅनेजमेंट इन फायनान्स क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअर निवडताना आणि प्रत्यक्ष कामाच्या वेळेला येणाऱ्या अडचणीसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहेत. गुणंतवणुक आणि मार्केटिंग क्षेत्रातील नवीन ट्रेंड या विषयावरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे." दरम्यान संकेत शहा, विनोद कशप व प्रकाश पटवर्धन यांनी आपले विचार मांडले.

Web Title: finance meet in data doctor discussion

टॅग्स