

वीज पडून मृत्यू झालेल्या
युवकाच्या कुटुंबाला मदत
शेलुबाजार, जि. वाशीम : मंगरूळपीर तालुक्यातील तांदळी येथील राहुल विष्णू राठोड या युवकाचा मागील महिन्यात वीज पडून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या राहुलच्या कुटुंबाला शासनाकडून मंजूर झालेल्या आर्थिक मदतीचा धनादेश आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
राहुल राठोड (वय ३०) हा गुरे चारण्यासाठी आणि शेतीकामासाठी शेतात गेला होता. अचानक वातावरणात बदल होऊन विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी त्याच्या अंगावर वीज पडून झालेल्या दुर्घटनेत जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेनंतर आमदार श्याम खोडे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुदर्शन धोटे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राठोड कुटुंबाची भेट दिली होती.
यावेळी आ. खोडे यांनी शासनाकडून नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंजूर झालेल्या मदतीचा धनादेश कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी आमदार श्री. खोडे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुदर्शन धोटे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
--- फोटो ---- B27739 ---
शेलुबाजार, जि. वाशीम : राठोड कुटुंबाला शासकीय मदतीचा धनादेश देताना आ. श्याम खोडे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.