पुणे : एका अफवेमुळे राज्यातील एका सक्षम वित्तीय संस्थेच्या मराठवाड्यातील काही शाखांमध्ये ठेवी काढण्यासाठी नव्हे, तर तारण ठेवलेले सोने सोडवून घेण्यासाठी कर्जदारांच्या रांगा लागल्याचे चित्र प्रथमच पाहावयास मिळाले. या पार्श्वभूमीवर अफवांचा विपरित परिणाम रोखण्यासाठी सहकारी वित्तीय संस्थांनी वित्तीय साक्षरता अभियान राबवावे, असे आवाहन बॅंकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी केले आहे.