बाप रे, कोरोनाचा कहर तरीही नागरिक वागताहेत बेजबाबदारपणे; एक कोटींचा दंड वसूल

जनार्दन दांडगे
Wednesday, 16 September 2020

-विनामास्क फिरणाऱ्यांकडून तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांचा दंड वसूल. 

-जिल्हा (ग्रामीण) पोलिसांची अठरा दिवसातील कामगिरी.

लोणी काळभोर : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील अठरा दिवसाच्या कालावधीत विनामास्क फिरणाऱ्या एक्कावन्न हजार नागरीकांवर जिल्हा (ग्रामीण) पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. या कारवाईतून पोलिसांनी तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांचा दंडही वसूल केला आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरीक स्वतःहून काळजी घेत नसल्यानेच, नाईलाजस्तव यापुढील काळात पोलिसांना आणखी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती जिल्हा (ग्रामीण)चे प्रभारी पोलिस अधिक्षक मिलींद मोहीते यांनी दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जिल्हाच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी 28 ऑगष्टपासून विनामास्क बाहेर पडणारे अथवा पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात भारतीय साथरोग अधिनियम १८९७, भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ आणि या संदर्भातील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियम अन्वये दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना ग्रामीण पोलिसांना दिल्या होत्या. या सचनेच्या आधारे  पोलिसांनी मागील अठरा दिवसांच्या काळात 51 हजार नागरीकांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांचा दंडही वसुल केला आहे. 

याबाबत अधिक माहिती देतांना प्रभारी पोलिस अधिक्षक मिलींद मोहीते म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध पातळीवर काम करत आहे. कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी मास्कचा वापर हाच एकमेव प्रभावी उपाय असल्याने, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या सुचनेनुसार पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई सुरु केलेली आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रांजणगाव पोलिस ठाणे प्रथम- विना मास्क विरोधातील कारवाईबद्दल अधिक माहिती देतांना मिलींद मोहीते म्हणाले, जिल्हात एकतीस पोलिस ठाणी असुन, विना मास्क विरोधातील कारवाईत रांजनगाव पोलिस ठाण्याने सहा लाख रुपयांचा दंड वसुल करुन जिल्हात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर बारामती तालुका पोलिस ठान्याने पाच लाख पाच हजार रुपयांचा दंड वसुल करुन द्वितीय तर लोणावळा शहर पोलिसांनी चार लाख नव्वद हजार रुपयांचा दंड वसुल करुन तृतीय कर्मांक पटकावला आहे. 

पोलिस स्टेशननिहाय केसेस (कंसात- दंड वसुली रुपयात)

बारामती शहर - १२२६ (१५३८३७), बारामती तालुका- २२९९ (५०५१००), वडगाव निंबाळकर- १२१५- (393601) , वालचंदनगर - १३४४ (२०२३००), भिगवण - १०९४ (२०५८००),  इंदापूर- ४३६६ (४६२१००)
 दौंड - २२४४ (४६३२००), यवत - २८०५ (४७००००), शिरूर- १३५९- (४४१४००), रांजणगाव- १५२१ (५८९९००), शिक्रापूर- १८०५- (३७९९००), सासवड- ३१२८- (३३२४००),  जेजुरी- २००७ (३८८८००), भोर- १०३९ (२९८८००), राजगड- १९८० (३८३५००),  हवेली- १२३६ (१६८५००), लोणी काळभोर- १५५० (४६४९००), वेल्हा- १०७१ (२४३८००), लोणीकंद- ११७४ (३०७८००), पौड -२१३६- (४४१७००), लोणावळा ग्रामीण- ११२० (२६९१००), लोणावळा शहर- १२९२ (४८५०००), वडगाव मावळ- २४५६-(४३१२५०), कामशेत- ९३० (३४४०५०), खेड- १५८५ (४८८४००), मंचर- १८७६ (४१३९००), घोडेगाव -१२०७ (२९८१००), जुन्नर -७१७ (२६६७५०), नारायणगाव- ८९२ (१७९०००), आळेफाटा -१४०५ (३१३८००) व ओतूर- ७४७ (१२००००).

व्यापारी अस्थापनात (कार्यालयात अथवा दुकानात) पाच अथवा पाचपेक्षा जास्त जण एकत्र आल्यास कायदेशिर कारवाई.

दरम्यान कापड दुकान, किराणा मालाचे दुकान असो वा हॉटेल..... ग्रामिन भागातील कोणत्याही व्यापारी अस्थापनात (कार्यालयात अथवा दुकानात) पाच अथवा पाचपेक्षा जास्त जण एकत्र येणाऱ्यावर उद्या (गुरुवार) पासुन कायदेशिर कारवाई करण्याचे आदेशही मिलींद मोहीते यांनी पोलिसांना दिले आहे. पाचपेक्षा अधिक एकत्र येण्यास बंदी असतानाही, व्यापारी अस्थापनात म्हणजेच कापड दुकान, किराणा मालाचे दुकान असो वा हॉटेल अशा ठिकाणी नागरीक गर्दी करत असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे एख्याद्या दुकानात पाचपेक्षा अधिक जण आढळुन आल्यास, मुंबई पोलीस कायदा कलम 37 (1/3) अंतर्गत दंडात्मक अथवा कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा (ग्रामिन)चे प्रभारी पोलिस अधिक्षक मिलींद मोहीते यांनी ग्रामिन पोलिसांना दिले आहेत.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A fine of Rs 1 crore was levied on those who walked without masks