Breaking News: अपहरण, खंडणीप्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा

सकाळ ऑनलाइन टीम
Tuesday, 5 January 2021

जळगावमधील शैक्षणिक संस्था संचालकाचे अपहरण, मारहाण करीत 5 लाखांच्या  घेतल्या प्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह 28 जणाविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : जळगावमधील एका शैक्षणिक संस्थाचा ताबा देण्यास नकार दिल्यामुळे संस्था संचालकाचे अपहरण करुन, चाकुचा धाक दाखवित धमकाविणे तसेच पाच लाख रूपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी भाजप नेते गिरिश महाजन यांच्यासह जळगावमधील 31 जणाविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी गिरीश दत्तात्रय महाजन (रा. जामनेर, जळगाव),  तानाजी भोईटे (रा. कोंढवा), निलेश भोईटे, विरेंद्र भोईटे (रा.भोइटेनगर जळगाव) यांच्यासह 29 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विजय पाटील (वय 52) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील हे व्यवसायाने वकील असून जळगावमधील विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित शैक्षणिक संस्थचे संचालक आहेत. संबंधित संस्था महाजन यांना पाहिजे होती, त्यासाठी त्यांनी पाटील यांना एक कोटी रुपयांची रक्कम देण्याचे आमिष दाखविले. मात्र पाटील यांनी त्यास नकार दिला. 

दरम्यान, संशयित आरोपीनी पाटील यांना संस्थासंबंधी कागदपत्रे देण्याचा बहाणा करुन पुण्यात बोलाविण्यात आले. त्यानंतर त्यांना शिविगाळ, दमदाटी करण्यात आली. तसेच फिर्यादी व त्यांच्यासमवेतच्या एका व्यक्तीला एका गाडीत जबरदस्तीने बसवुन सदाशिव पेठेत एका सदनिकेत नेऊन हात-पाय बांधून डांबले. तसेच त्यांना मारहाण करीत चाकूचा धाक दाखविला. फिर्यादीने सर्व संचालकांचे राजीनामे न आणल्यास त्यांना एमपीडीएच्या गुन्हेत अडकविण्याची धमकी देत 5 लाखाची खंडणी घेतली. या घटनेनंतर जळगाव येथे संस्थाची तोडफोडही केली. हा प्रकार जानेवारी 2018 ते जानेवारी 2021 या कालावधीत घडला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त करीत आहेत.

जुन्नरच्या आजींची कमाल! वयाच्या ७२ वर्षी 2 दिवसात 2 किल्ले केले सर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fir file against bjp leader girish mahajan in kothrud police station