

navale bridge accident
sakal
पुणे - पुणे-बंगळूर महामार्गावरील नवले पूल परिसरात गुरुवारी झालेल्या भीषण अपघातानंतर सिंहगड रस्ता पोलिसांनी कंटेनरचा मालक, चालक आणि क्लीनर अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात कंटेनरच्या चालक आणि क्लिनरचा समावेश होता.