Fire Accident : नारायणगाव येथील कापड दुकानाला आग; चार कोटी रुपयांचे नुकसान
Short Circuit : नारायणगाव येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या अष्टविनायक रेडीमेड कापड दुकानाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत ११ गाळे जळून ४ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
नारायणगाव : येथील नारायणगाव जुन्नर रस्त्यालगत मुख्य बाजारपेठेत असलेल्या अष्टविनायक रेडीमेड या कापड दुकानाला आग लागून तयार कपडे, फर्निचर व दुकानातील सर्व साहित्याचे जळून सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले.