Pune : हिंगण्यातील मांडव साहित्याच्या गोदामाला आग ; आग विझविण्यासाठी चार बंब आणि दोन पाण्याचे टँकर

सिंहगड रस्ता येथील हिंगणे परिसरातील खोराड वस्ती भागात मध्यरात्री आग लागली. ही आग इतकी मोठी होती की, आग विझविण्यासाठी चार बंब आणि दोन पाण्याचे टँकर लागले. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेबाराच्या सुमारास आग लागल्याची माहिती कळवण्यात आली.
Pune
Punesakal

सिंहगड रस्ता : येथील हिंगणे परिसरातील खोराड वस्ती भागात मध्यरात्री आग लागली. ही आग इतकी मोठी होती की, आग विझविण्यासाठी चार बंब आणि दोन पाण्याचे टँकर लागले. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेबाराच्या सुमारास आग लागल्याची माहिती कळवण्यात आली.

घटनास्थळी मांडवाचे साहित्य लाकडी वासे, बांबू, फळ्या, सजावटीचे साहित्य, इलेक्ट्रिक वायरिंग, पत्रे, खुर्च्या इत्यादी आगीत जळून भस्मसात झाले. ही जागा शेखर देशपांडे यांच्या मालकीची आहे. अमरनाथ मंडप डेकोरेटर्स नावाने त्यांचा मांडव व्यवसाय आहे अंदाजे तीन हजार पाचशे चौरस फूट क्षेत्रफळाची ही जागा आहे. तर पाच फूट आजूबाजूला भिंत आणि त्याचा परिसर आहे.

Pune
Pune : दौंड रेल्वे उड्डाण पुलाजवळ इंधन वाहक मालगाडी घसरली; वाहतूक सुरळीत

या आगीत कोणीही जखमी झाले नाही. साधारण 45 मिनिटे आग विझवण्यासाठी गेले तर त्यानंतर दिड ते दोन तास धुमसत असलेली आग विझवण्यासाठी लागला. यात मांडवाचे सर्व साहित्य जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे रात्री एक दीडच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला रात्रभर वीज पुरवठा नव्हता. अविनाश विहार ए, बी, सी गणाधीश संकुल, सुदत्त संकुल इत्यादी परिसरात वीजपुरवठा सकाळी अकरा वाजेपर्यंत ही सुरू झाला नव्हता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com