चिंचवडमध्ये गॅरेजला भीषण आग; मोठे नुकसान

fire
fire

पिंपरी : चिंचवड गावातील केशवनगर येथे गॅरेजला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी (ता. 3) रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली.

चिंचवडगावातून काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर केशवनगर येथे एक गॅरेज आहे. या गॅरेजला मंगळवारी रात्री अचानक आग लागली. यामध्ये गॅरेजमधील वाहने तसेच आजूबाजूची वाहने जळाली. घटनेची माहिती मिळताच पिंपरीतील संत तुकारामनगर अग्निशामक केंद्रातील पाच वाहने घटनास्थळी दाखल झाली.  

युद्धपातळीवर आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून या घटनेमुळे या परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत समजू शकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com