पुण्यातील टेकड्यांवर वणवा; आगीच्या घटनांमध्ये होतेय वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 24 December 2020

पुण्यात आज दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या.

पुणे- पुण्यात आज दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. कोथरूड मधील एआरएआय टेकडीवर आग लागली. आगीचा आवाका मोठा आहे. त्यात डोंगर उताराचा भाग असल्याने अग्निशमन दल पोहचणे अवघड आहे. त्यामुळे येथील 

वृक्ष संपदेला व जैव विविधतेरा धोका निर्माण झाला आहे. या भागात मोर, ससे  व पक्ष्यांची संख्या जास्त आहे. त्यांना वाचविण्यासाठी वनखाते काय करणार असा प्रश्न शिल्पा सोसायटीतील रहीवाशी चंद्रहास शेट्टी यांनी उपस्थित केला. दिलीप कानडे यांनी अग्निशमन दलाला फोन करून आगीची माहिती दिली. वनअधिकारी दिपक पवार यांनी सांगितले की, वनविभाग व अग्निशमन दल आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

नव्या कोरोनाला रोखण्यास आमची लस सक्षम; अमेरिकेतील कंपनीचा दावा

बाणेर टेकडीवर तिसरी आगीची घटना 

बाणेरच्या तुकाई टेकडीवरही आज 24 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान पुन्हा आग लागली होती. 20 डिसेंबर पासून ही तिसरी आगीची घटना असुन आग कशी लागली किंवा कोणी जाणून बुजून लावली हे समजू शकले नाही. तुकाई टेकडीच्या मध्यवर्ती भागात एक खाण असुन या खाणीजवळ आग लागली, याच भागात वसुंधराअभियान कडून नेमलेले कर्मचारी जवळच काम करत असल्यामुळे  त्यांना टेकडीवर धूर येताना दिसताच ते त्या ठिकाणी पोहचून लगेचच आग विझवली, त्यामुळे पुढचे आगीमुळे होणारे झाडांचे नुकसान टळले. तुकाई टेकडीचा परिसर खूप मोठा आहे, या परिसरात वसुंधरा अभियानचे सदस्य सकाळी 6 ते 9 पर्यंत झाडांच्या देखभालीचे काम करतात. त्यानंतर वसुंधरा कडून नेमलेले काही कामगार टेकडीवर काम करतात. पण टेकडीचा परिसर मोठा असल्यामुळे सगळीकडे लक्ष ठेवणे अशक्य असल्याचे वसुंधरेच्या सदस्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire on the hills of Pune Increases in incidents