भुईकोट किल्ल्यात आग
SLC26B28298
सोलापूर : खंदक बागेत लागलेल्या आगीमुळे जळालेले वृक्ष.
---
खंदक बागेतील आगीमुळे
काही वृक्षांचे नुकसान
सकाळी वृत्तसेवा
सोलापूर, दि. २७ : शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरातील खंदक बागेत बुधवारी (ता. २५) सायंकाळी सातच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे प्रचंड ज्वाळांचे लोळ बाहेर दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सजग नागरिकाने तत्काळ या घटनेची माहिती उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी विलंब न लावता अग्निशामक अधिकारी साळुंके यांच्याशी संपर्क साधून अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी रवाना केली. अग्निशामक दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.
उपमहापौर देवकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजनांच्या सूचना दिल्या. भुईकोट किल्ला व बागेच्या सुरक्षेसंदर्भात पुरातत्त्व विभाग, महापालिका, पोलिस प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या आगीत काही प्रमाणात वृक्षांचे नुकसान झाले असले तरी मोठी हानी टळली आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, चौकशी सुरू आहे. काही तरुण किल्ल्यात प्रवेश करून अमली पदार्थांचे सेवन करतात; त्यामुळे आग लागली असावी, अशी शक्यता काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याप्रसंगी सुरक्षा कर्मचारी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, महापालिका कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान तसेच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

