esakal | आंबेगावमध्ये एमएनजीएलच्या लाईनला आग
sakal

बोलून बातमी शोधा

Fire at MNGL line in Ambegaon

पाईपलाइन लिकेज झाल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक माहिती अग्निशामक दलाच्या आधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांकडून पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

आंबेगावमध्ये एमएनजीएलच्या लाईनला आग

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दत्तनगरमधील गॅस वाहिनीला लागलेली आग आटोक्यात

दत्तनगर (पुणे) : साई दत्त निवास या सोसायटीला गॅस पुरविणाऱ्या एमएनजीएल (MNGL) गॅस वहिनीला सकाळी अचानक आग लागली होती. ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास दत्तनगर येथे टेल्को कॉलनीमधील साई दत्त निवास या सोसायटीला गॅस पुरविणाऱ्या वहिनीला आग लागली होती. त्यानंतर, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण केले होते. कात्रज अग्निशमन दलाचे दहा ते आकरा जवानांनी घटनास्थळी पोहचून अर्ध्यातासात आग आटोक्यात आणली. दरम्यान एमएनजीएल (MNGL)गॅसचे अधिकारीही घटनास्थळी दाखल होऊन गॅस पुरवठा तात्काळ बंद  करण्यात आला. 

''सदरील गॅस वाहिनी ही विद्युत महावितरणाच्या रोहित्रा शेजारून जात असून,तिची खोली एक ते दीड फूट इतकीच आहे. शिवाय आग लागलेल्या ठिकाणी गॅस वाहिनी ही जमिनीवर उघडी असल्याने ही आग लागली असावी. गॅस वहिनीला आग ही शॉर्टसर्किटमुळे लागू शकते किंवा एखादी जळालेली वस्तू तिच्यावर पडली असल्यानेही आग लागू शकते.'' असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. गॅस वहिनीला लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

''निश्चित कारण सांगता येणार नाही. परिसरात अशी आग लागण्याची घटना पहिलीच आहे.''
-कौस्तुभ महिरे, परिसर निरीक्षक एमएनजीएल (MNGL)

''साडे आकाराच्या सुमारास आम्हाला अग लागल्यासंबंधी फोन आला. जवान तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली''. 
-सुभाष जाधव, प्रभारी अधिकारी कात्रज अग्निशमन

loading image