esakal | पुण्यातील जांभुळवाडी नवीन बोगद्याच्या वर आग; वन्यजीवांच्या जीवितास धोका
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Fire

पुणे-बंगळुरु महामार्गावरील जांभुळवाडी नवीन बोगद्याच्या वर वणवा लागल्याची घटना आज (ता. ०८) सायंकाळी ८ च्या सुमारास घडली.

पुण्यातील जांभुळवाडी नवीन बोगद्याच्या वर आग; वन्यजीवांच्या जीवितास धोका

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कात्रज : पुणे-बंगळुरु महामार्गावरील जांभुळवाडी नवीन बोगद्याच्या वर वणवा लागल्याची घटना आज (ता. ०८) सायंकाळी ८ च्या सुमारास घडली. कात्रज घाटात वणवा लागल्याची घटना नुकतीच घडली असताना पुन्हा जांभुळवाडी भोगद्याच्यावर वणवा लागला आहे. ही आग एवढी मोठी होती की कात्रज-आंबेगाव परिसरातून सहज दिसत होती. अग्निशमन दलाच्या गाड्या डोंगरावर उंचपर्यंत पोहोचू शकत नव्हत्या. ही आग खासजी मालकीच्या क्षेत्रात लागली होती. मात्र ती पसरत वनविभागाच्या क्षेत्रातही आली होती. ही आग विझवण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले असले तरी तीन तासांनंतरही आग आटोक्यात आली नव्हती. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती कात्रज विभागाचे वनपाल समीर इंगळे यांनी दिली.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आगीमध्ये कुठलेही नुकसान झालेले नसले तरी वन्यजीवांसाठी मोठा धोका निर्माण झाला असून मागील महिनाभरात तिसऱ्यांदा अशा प्रकारची आग लागली आहे. यामुळे पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. काही दिवसांपूर्वीच कात्रज घाटात शिंदेवाडी ग्रामपंचायत हद्दीत आग लागली होती. तर दुसऱ्यांदा भिलारेवाडी ग्रामपंचायत हद्दीत आग लागल्याची घटना घडली होती. कात्रज घाटातील डोंगरावर अशा प्रकारच्या आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत.

loading image